bank of maharashtra
bank of maharashtra

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीत विजयी झालेल्या जयश्री चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतली सदिच्छा भेट

0

मुंबई: कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीत विजयी झालेल्या जयश्री चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी श्रीमती जाधव यांचे अभिनंदन केले, तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्याच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनीही यावेळी श्रीमती जाधव यांना शुभेच्छा दिल्या.

या भेटी प्रसंगी गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार प्रा. संजय मंडलिक, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, शिवसेनेचे पदाधिकारी अरूण दुधवडकर, संजय पवार, विजय देवणे आदी उपस्थित होते.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech