हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे

0

मुंबई: हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात आज करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या वतीने हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालयासमोर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा,मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुंबई शहराचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपेकर, मातृभक्त शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे सदस्य सत्यशील राजगुरू, उमा संजीव महादेकर, स्मारक निर्मिती समितीचे ॲड. प्रथमेश पाडेकर आदी उपस्थित होते.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech