कोरोनामुक्ती’ची पहाट घेऊन आलेला गुढीपाडवा राज्यात सुख-समृद्धी,आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो

0

मुंबई:- कोरोनामुक्ती’ची पहाट घेऊन आलेला गुढीपाडवा राज्यात सुख-समृद्धी,आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. कोरोनामुक्तीची पहाट घेऊन आलेला यंदाचा गुढीपाडवा आणि मराठी नववर्ष सर्वांच्या जीवनात सुखसमृद्धीआनंदउत्तम आरोग्य घेऊन येऊदेमहाराष्ट्राच्या अभिमानस्वाभिमानएकजुटीची गुढी अशीच उंच उंच जाऊदे… अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सर्वांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

            गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त महाराष्ट्रवासियांनाजगभरातील मराठीभाषीकमराठीप्रेमी  बांधवांना शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीवसंतऋतुच्या आगमनासोबत सुरु होणारे मराठी नववर्ष आणि त्यानिमित्ताने साजरा होणारा गुढी पाडव्याचा सण यंदा कोरोनामुक्तीची पहाट घेऊन आला आहे. दोन वर्षांच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईनंतर उगवलेली कोरोनामुक्तीची पहाट आनंददायीउत्साह वाढवणारी आहे. कोरोनाचे संकट संपण्याच्या मार्गावर असून मुख्यमंत्री यांनी कोरोनासंदर्भातील निर्बंध हटवून राज्यातील जनतेला गुढीपाडव्याची अनोखी भेट दिली आहे. कोरोनाकाळात अवलंबलेली स्वच्छतासुरक्षिततेची सवय वैयक्तिकसार्वजनिक जीवनात यापुढेही कायम ठेवूया… निरोगीबलशाली महाराष्ट्र घडवण्यात योगदान देऊया…असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केले आहे.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech