महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर कुमार बिस्वास सेवानिवृत्त

0

नवी दिल्ली: महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर कुमार बिस्वास सेवानिवृत्त . अपर मुख्य सचिव तथा महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर कुमार बिस्वास हे गुरुवारी (31 मार्च) नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असून त्यांना निरोप देण्यात आला.

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात निरोप सभारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

समीर कुमार बिस्वास हे भारतीय प्रशासकीय सेवेतील १९९०च्या तुकडीचे महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी असून ३१ वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत त्यांनी महाराष्ट्र शासन व केंद्र शासनामध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर कार्य केले आहे. श्री. बिस्वास गेल्या सात वर्षांपासून प्रतिनियुक्ती तत्वावर केंद्र शासनाच्या सेवेत कार्यरत होते. महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर कुमार बिस्वास सेवानिवृत्त राज्यातील आहे.

श्री. बिस्वास यांनी वर्ष २००० ते २०१२ पर्यंत महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे तसेच राज्य आर्थिक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक,राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक, जनगणना प्रकल्पाचे संचालक आदी पदांवर कार्य केले . राज्य रस्ते विकास महामंडळात कार्यरत असतांना त्यांनी ‘मुंबई ट्रांस हार्बर लिंक’ सह अनेक महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांच्या उभारणीत उल्लेखनीय जबाबदारी पार पाडली होती .वर्ष २०१२ ते २०१४ या कालावधीत त्यांनी मुंबई येथील धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती .

श्री. बिस्वास यांच्या सेवानिवृत्तीनंतर महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त पदाचा कार्यभार सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांना सोपविण्यात आला आहे.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech