मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. तर्फे पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग उपनगरीय रेल्वे कॉरिडोरचे काम दिनांक ०९/११/२०२३ रोजी ११.०० वा. ते १७.०० वा. च्या दरम्यान करण्यात येणार आहे

0

मुंबई :   मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. तर्फे पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग उपनगरीय रेल्वे कॉरिडोरचे काम दिनांक ०९/११/२०२३ रोजी ११.०० वा. ते १७.०० वा. च्या दरम्यान करण्यात येणार आहे

यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई वाहिनीवर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. तर्फे पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग उपनगरीय रेल्वे कॉरिडोरचे काम किमी ०७.५६० (चिखले ब्रिज) येथे दिनांक ०९/११/२०२३ रोजी ११.०० वा. ते १७.०० वा. च्या दरम्यान करण्यात येणार आहे.

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. तर्फे करण्यात येणाऱ्या वरील नियोजित कामाचे वेळी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई वाहिनीवर सर्व प्रकारची वाहने (हलकी व जड अवजड वाहने) यांची वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग
१. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे बाजू कडून मुंबई बाजूकडे येणारी वाहने मुंबई लेन कि.मी. ९.६०० पनवेल एक्झिट वरून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावर करंजाडे मार्गे कळंबोली अशी वळविण्यात येतील.
२. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावरून पुणे बाजू कडून मुंबई बाजूकडे येणारी वाहने शेडुंग फाट्यावरून बोर्ले टोल नाक्याकडे न येता सरळ पनवेलच्या दिशेने मार्गस्थ करण्यात येतील.
३. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे बाजू कडून मुंबई बाजूकडे येणारी हलकी वाहने कि.मी. ३९.८०० खोपोली एक्झिट वरून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावरून मार्गस्थ करण्यात येतील.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech