मुंबईत 3 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी

0

मुंबईत 3 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी : शांतता व सार्वजनिक सुव्यवस्था भंग होऊ नये, मानवी जीवन व मालमत्तेचे गंभीर नुकसान टाळण्यासाठी पाच किंवा अधिक व्यक्तींच्या हालचाली आणि बेकायदेशीर एकत्र येण्यावर मुंबई क्षेत्रात ३ फेब्रुवारीपर्यंत बंदी असल्याची माहिती पोलीस उप-आयुक्त (अभियान) विशाल ठाकूर यांनी दिली आहे.

या आदेशान्वये पाच किंवा अधिक व्यक्तींच्या कोणत्याही संमेलनास प्रतिबंध, कोणत्याही व्यक्तीची कोणतीही मिरवणूक आणि कोणत्याही मिरवणुकीत लाऊडस्पीकर, वाद्ये, वाद्य बँड आणि फटाके फोडण्यास अशा प्रकारच्या कार्यवाहीस तसेच ज्वलनशील पदार्थ वापर करण्यास बंदी करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.

अत्यसंस्कार, विवाह समारंभ, कंपन्या, क्लब, सहकारी संस्था, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, न्यायालये, शाळा, दुकाने, कारखाने, व्यवसाय आणि आवाहनासाठी संमेलनास या आदेशातून वगळण्यात आले असल्याची माहितीही पोलीस उप आयुक्त कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech