मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस

0

 

ठाणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस तुमच्या बहादुरीचे वर्णन कोणत्या शब्दात करू… चिंता करू नका लवकर बरे व्हा हल्लेखोरांवर कडक कारवाई होणार. ताई, तुमच्या बहादुरीचे वर्णन कोणत्या शब्दात करू…तुम्ही चिंता करू नका लवकर बरे व्हा अशा शुभेच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांना दिल्या.

फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करताना श्रीमती पिंपळे यांच्यावर हल्ला झाला होता. त्या सध्या रुग्णालयात उपचार घेत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, तुमच्या बहादुरीचे वर्णन कोणत्या शब्दात करावे..ताई तुम्ही काळजी करु नका तुमच्यावर हल्ला करणाऱ्याला कठोर शासन केले जाईल. तुम्ही चिंता करू नका लवकरात लवकर बरे व्हा, राज्य शासन आपल्या पाठीशी आहे, असा दिलासा देतानाच तुमच्या प्रकृतीची मी रोज माहिती घेत असतो. काळजी करू नका ठणठणीत बरे व्हा, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी श्रीमती पिंपळे यांची विचारपूस केली.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्याकडून श्रीमती पिंपळे यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली. त्यांनी महापौरांच्या मोबाईलवरून श्रीमती पिंपळे यांच्याशी संवाद साधला. यावेळी महापालिका आयुक्त विपीन शर्मा उपस्थित होते. श्रीमती पिंपळे यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech