महाराष्ट्रातील एक कोटींपेक्षा जास्त ग्रामीण घरांमध्ये नळाचे पाणी उपलब्ध झाले आहे जल जीवन योजना – हर घर जल’चा महाराष्ट्रातील 53 लाख ग्रामीण कुटुंबांना लाभ

0

मुंबई: महाराष्ट्रातील एक कोटींपेक्षा जास्त ग्रामीण घरांमध्ये नळाचे पाणी उपलब्ध झाले आहे जल जीवन योजना – हर घर जल’चा महाराष्ट्रातील 53 लाख ग्रामीण कुटुंबांना लाभ.महाराष्ट्रातील 1 कोटी 46 लाख 9 हजार ग्रामीण कुटुंबांपैकी 1 कोटी 01 लाख 89 हजार म्हणजेच 69.75% कुटुंबांना नळाद्वारे पाणी पुरवठा ही सुविधा प्राप्त झाली आहे. ही माहिती गेल्या आठवड्यातील म्हणजेच 22 मार्च 2022 रोजीच्या आकडेवारीवर आधारित आहे.

2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण घरात नळाद्वारे पाणी पुरवठा व्हावा म्हणून 2019 पासून महाराष्ट्रातील एक कोटींपेक्षा जास्त ग्रामीण भारत सरकार राज्यांच्या सहभागातून जल जीवन योजना – हर घर जल ही योजना राबवत आहे.

या योजनेची घोषणा झाली तेव्हा नोंदवलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील 48 लाख 44 हजार म्हणजे 33.16% घरांमध्ये नळाच्या जोडण्या होत्या.

त्यानंतर राज्यातल्या अजून 53 लाख 46 हजार म्हणजे 36.59% ग्रामीण घरांमध्ये पाण्याच्या नळाच्या जोडण्या देण्यात आल्या. 2024 सालापर्यंत सर्व ग्रामीण घरांमध्ये पिण्याचे पाणी नळाद्वारे उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार योजना आखत आहे.

केंद्राकडून महाराष्ट्रासाठी मंजूर झालेल्या आणि राज्याला मिळालेल्या आणि जल जीवन मिशन अंतर्गत 2021-22 वर्षासाठी (22.03.2022 रोजी च्या माहितीनुसार) उपयोगात आणलेल्या अनुदानाचा तपशील खालीलप्रमाणे: (रक्कम  कोटी रुपयांमध्ये)

Year Central Share Expenditure under State share
Opening Balance Budget allocation Fund drawn by the State Total available fund Reported utilization
2021-22 268.99 7,064.41 1,666.64 1,935.63 293.32 361.72

 

जलजीवन योजनेअंतर्गत महाराष्ट्रात झालेल्या प्रगतीचा जिल्हानिहाय तपशील आणि जलजीवन मिशनच्या सार्वजनिक उपलब्ध माहितीनुसार असलेली , डॅशबोर्डवरील टक्केवारी https://ejalshakti.gov.in/jjmreport/JJMIndia.aspx येथे पाहता येईल.

संसदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.

घरगुती नळ जोडणी 100% कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट जळगाव जिल्ह्याने साध्य केले आहे तर या कामी जालना , धुळे आणि नागपूर जिल्ह्याने 90 टक्क्याहून जास्त प्रगती केली आहे. त्यानंतर सोलापूर, नागपूर, आणि बुलढाणा जिल्ह्यात 80 टक्केहून जास्त कुटुंबांना नळ जोडणी मिळाली आहे.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech