bank of maharashtra
bank of maharashtra

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी साधला आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद मागण्यांसंदर्भात बैठकीचे आयोजन

0

मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी साधला आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद मागण्यांसंदर्भात बैठकीचे आयोजन. मुंबई विद्यापीठ कलिना कॅम्पसच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांविषयी उद्या दुपारी ३ वाजता बैठक देखील श्री.सामंत यांनी बोलावली आहे.

आंबेडकर स्टुडंटस् असोसिएशनच्या वतीने विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कलिना कॅम्पसच्या प्रवेशद्वारावर बेमुदत धरणे आंदोलन साखळी उपोषण सुरू होते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत यांनी यांसंदर्भात माहिती घेवून लगेच आंदोलक विद्यार्थांची भेट घेतली. त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या आणि त्यासंदर्भात उद्या मंत्रालयात बैठक घेणार असल्याचे जाहिर केले. उच्च व तंत्र शिक्षण संचालकांना विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत चौकशी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.सामंत म्हणाले, राज्यातील कुठल्याही विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्य शासन तत्पर आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांविषयी सकारात्मक निर्णय घेऊ असेही श्री.सामंत यांनी सांगितले.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech