नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक स्पेशलला ८ जूनपर्यंत मुदतवाढ

0

रत्नागिरी, 20 फेब्रुवारी : विदर्भ आणि कोकणाला जोडणाऱ्या आणि आठवड्यातून दोनदा धावणार्या नागपूर-मडगाव साप्ताहिक रेल्वेगाडीला ८ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

यापूर्वी ही गाडी २८ फेब्रुवारीपर्यंतच धावणार होती. गर्दीचा हंगाम लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे. विदर्भातून थेट कोकण मार्गावर येण्यासाठी ०११३९/०११४० क्रमांकाच्या नागपूर-मडगाव साप्ताहिक विशेष गाडीला पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती.

ती मान्य झाली असून १ मार्च ते ७ जून या कालावधीत दर बुधवार व परतीच्या प्रवासात २ मार्च ते ८ जूनपर्यंत दर गुरुवार आणि रविवारी ही गाडी धावेल. एकूण २२ डब्यांच्या या गाडीला वर्धा, पुलगाव, धामणगाव, वडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, थिवी आणि करमळी या स्थानकांवर थांबे आहेत.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech