मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन

0

मुंबई:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जयंती निमित्त विनम्र अभिवादन केले आहे.

अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, ‘स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून शंभुराजे यांनी अतुलनीय असा पराक्रम गाजवला. शिवबाच्या या छाव्याने आपल्या पराक्रमाने मुघलांना गुडघे टेकायला भाग पाडले. औरंगजेबाला जेरीस आणून, त्याचा दख्खन बळकावण्याचा मनसुबा मातीत गाडून टाकला. युद्धनीती, शास्त्र, कला यांसह अनेक भाषांमध्ये विविधांगी लेखन करून शंभुराजेंनी विद्वत्तेचा परिचय करून दिला. राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांनी साकारलेल्या स्वराज्यासाठी त्यांनी प्राणपणाने लढा दिला. महान योद्धा, धुरंधर, प्रजाहितदक्ष, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना मानाचा मुजरा आणि जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन!’

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech