bank of maharashtra
bank of maharashtra

लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

0

 

मुंबई: लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती आज विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे विशेष कार्य अधिकारी अनिल महाजन, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती यांचे सचिव महेंद्र काज, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव रविंद्र जगदाळे, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र, जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, महाराष्ट्र विधानमंडळाचे उप मुख्य सुरक्षा अधिकारी चंद्रशेखर सावंत यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लोकमान्य टिळक यांच्या अर्धपुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech