‘डिजिटल बँकिंग आणि भाषा’ ह्या विषयावर बँक ऑफ महाराष्ट्र द्वारे दिल्लीमध्ये अखिल भारतीय हिंदी सेमिनारचे आयोजन

0
डिजिटल बँकिंग आणि भाषा

All India Hindi Seminar on “Digital Banking and Languages” organised by Bank of Maharashtra at Delhi From L to R – Shri K. Rajesh Kumar, GM (HRM & Rajbhasha); Shri A. S. Rajeev, MD & CEO, Bank of Maharashtra; Ms. Anshuli Arya, IAS, Secretary, Department of Official Language, Ministry of Home Affairs, Govt. of India; Ms. Chitra Datar, GM & Zonal Head, Delhi

पुणे- ‘डिजिटल बँकिंग आणि भाषा’ ह्या विषयावर बँक ऑफ महाराष्ट्र द्वारे दिल्लीमध्ये अखिल भारतीय हिंदी सेमिनारचे आयोजन. बँक ऑफ महाराष्ट्र ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक आहे. देशभरातील सर्व बँका, वित्तीय संस्था आणि विमा कंपन्यांसाठी बँकेने ‘डिजिटल बँकिंग आणि भाषा’ या विषयावर दिल्लीमध्ये अखिल भारतीय हिंदी सेमिनार आयोजित केले. सुश्री अंशुली आर्या, आई.ए.एस., सचिव, राजभाषा विभाग, गृह मंत्रालय, भारत सरकार या सेमिनारमध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री ए. एस. राजीव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

सेमिनारमध्ये श्री के. राजेश कुमार, महाव्यवस्थापक, मानव संसाधन व्यवस्थापन आणि राजभाषा, प्रधान कार्यालय आणि सुश्री चित्रा दातार, महाव्यवस्थापक आणि झोनल मॅनेजर, दिल्ली झोन ​​प्रमुखपणे उपस्थित होते. श्री सुधीर श्याम, आर्थिक सल्लागार, वित्तीय सेवाएं विभाग, वित्त मंत्रालय यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहून सर्वांचे मार्गदर्शन केले. या सेमिनारमध्ये सर्व बँका, वित्तीय संस्था आणि विमा कंपन्यांचे उच्च अधिकारी आणि राजभाषेचे अधिकारी देखिल मोठ्या संख्येने सहभागी झाले.

प्रमुख पाहुण्या सुश्री अंशुली आर्या यांनी आपल्या भाषणात सांगितले की, बँका आणि वित्तीय संस्था ह्या कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया असतात. बँकिंग सेवेच्या माध्यमातून तुम्ही देशाची सेवा करत असल्याचे त्यांनी बँकर्सना सांगितले. सुश्री अंशुली आर्या म्हणाल्या की, डिजिटल बँकिंगमध्ये हिंदी आणि प्रादेशिक भाषांचा वापर आज खूप महत्त्वाचा आहे आणि दुर्गम भागातील ग्राहकांनाही याचा फायदा होणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्र आणि इतर बँकांकडून या दिशेने होत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

श्री के. राजेश कुमार, महाव्यवस्थापक, मानव संसाधन व्यवस्थापन आणि राजभाषा यांनी सर्व सहभागींचे स्वागत केले. चर्चासत्रात अतिथी वक्त्यांनी महत्त्वाच्या विषयांवरील सत्रे घेतली. यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बँकेच्या विविध हिंदी अॅप्स आणि ब्रेल लिपीतील पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. बँक ऑफ महाराष्ट्र ने आयोजित केलेल्या अखिल भारतीय हिंदी निबंध स्पर्धेतील विजेत्यांनाही यावेळी पारितोषिक देण्यात आले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री ए. एस. राजीव म्हणाले की, हे डिजिटलायझेशनचे युग आहे. हिंदी आणि प्रादेशिक भाषा ह्या आपले विचार आणि आपल्या योजना दूरवरच्या भागात पोचवण्याचे शक्तिशाली माध्यम आहेत.

महाव्यवस्थापक आणि दिल्ली झोनच्या झोनल मॅनेजर सुश्री चित्रा दातार यांनी सर्वांचे आभार मानले. सेमिनारचे सूत्रसंचालन प्रधान कार्यालयाचे उपमहाव्यवस्थापक (राजभाषा) डॉ. राजेन्द्र श्रीवास्तव यांनी केले.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech