चीनचे भारतातील राजदूत आणि बेल्जियमच्या राजदूतांनी घेतली

0

मुंबई- चीनचे भारतातील राजदूत आणि बेल्जियमच्या राजदूतांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट. चीनमधील भारताचे राजदूत श्री प्रदीपकुमार रावत तसेच बेल्जियमचे राजदूत डिडियर वेंडरहॅसेल्ट यांनी आज दोन वेगवेगळ्या भेटींमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.

चीनमधील भारताचे राजदूत श्री प्रदीपकुमार रावत यांनी उपमुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ग्रीन एनर्जी, पायाभूत सुविधा, उद्योग क्षेत्रातील संधी अशा विविध विषयांवर चर्चा झाली. बेल्जियमचे राजदूत डिडियर वेंडरहॅसेल्ट यांच्यासोबत महाराष्ट्रातील गुंतवणूक, बेल्जियमचे महाराष्ट्रातील उद्योगसमूह, येणाऱ्या काळात यायची गुंतवणूक अशा विविध विषयांवर चर्चा झाली. या बैठकींदरम्यान मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगरानी, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे उपस्थित होते.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech