यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीबाबत शासन निर्णय निर्गमित

0

 

 

मुंबई:यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीबाबत शासन निर्णय निर्गमित. विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील कुटुंबाचे राहणीमान उंचाविणे, त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवून त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी, त्यांना विकासाच्या मूळ प्रवाहात येता यावे यासाठी ग्रामीण भागातील विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी राज्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविण्यात येते.

विमुक्त जाती, भटक्या जमाती या घटकासाठी सुरु असलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत लाभार्थींची निवड करताना विधवा, विधुर, अपंग, अनाथ, परित्यक्त्या, वयोवृद्ध या व्यक्तींना प्राधान्य देण्यात येणार आहे. याबाबतचा शासननिर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभागाने निर्गमित केला असून www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तो प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech