वीजदर सवलतीसाठी यंत्रमाग घटकांनी ऑनलाईन अर्ज करण्याची 28 फेब्रुवारी 2021 अंतिम मुदत

0

 

मुंबई : वीजदर सवलतीसाठी यंत्रमाग घटकांनी ऑनलाईन अर्ज करण्याची 28 फेब्रुवारी 2021 अंतिम मुदत.महाराष्ट्र वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ अंर्तगत वीजदर सवलत मिळणाऱ्या यंत्रमाग घटकांसाठी आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दि. 28 फेब्रुवारी, 2021 ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे वीजदर सवलत मिळण्यासाठी यंत्रमागधारकांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन वस्त्रोद्योग आयुक्तालयाने केले आहे.

वस्त्रोद्योग आयुक्तालयाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, राज्य शासनाच्या दिनांक 21 डिसेंबर 2018 अन्वये राज्याच्या वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वस्त्रोद्योग घटकांना वीजदर सवलत लागू करण्यात आली आहे. वीजदर सवलतीस पात्र असणाऱ्या यंत्रमाग घटकांना आयुक्तालयाच्या https://www.dirtexmah.gov.in वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज दिनांक 31 डिसेंबर 2020 पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक होते. परंतु यंत्रमाग घटकांनी ऑनलॉईन नोंदणी केलेली नसल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे 27 अश्वशक्ती पेक्षा कमी व त्यापेक्षा जास्त जोडभार असलेल्या यंत्रमाग घटकांना ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याची अंतिम मुदतवाढ दिनांक 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढविण्यात येत आहे.

या मुदतवाढीमध्ये जर संबंधित यंत्रमागांनी ऑनलाईन नोंदणी करीता अर्ज सादर केला नाही, तर सदर यंत्रमाग नोंदणी करीत नाही तोपर्यंत त्यांची वीजदर सवलत बंद करण्यात येईल, असे वस्त्रोद्योग आयुक्त शीतल तेली –उगले यांनी कळविले आहे.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech