विधानभवन प्रांगणात सभापती, उपसभापती यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

0

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानभवन प्रांगणातील शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठीत पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी आमदार प्रकाश आवाडे, विधानमंडळाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत, सभापतींचे सचिव महेंद्र काज, अवर सचिव रवींद्र जगदाळे, सुनील झोरे, वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक तथा विधानसभा अध्यक्षांचे विशेष कार्य अधिकारी निलेश मदाने यांच्यासह विधानभवनातील अधिकारी, कर्मचारी यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

00000

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech