वरुड व मोर्शी तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना द्यावी- पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे.

0

 मुंबई : वरुड व मोर्शी तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना द्यावी– पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे.वरुड व मोर्शी तालुक्यातील महानुभाव पंथाची काशी असलेल्या रिद्धपूर‘ व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची तपोभूमी असलेले नागठाणा‘ या क्षेत्रांत पायाभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात तसेच  सौदर्यीकरणाची कामे करुन येथील पर्यटन अधिक विकसित व्हावेयासाठी या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करण्याबाबतचे निर्देश पर्यटन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी दिले.

          वरुड व मोर्शी तालुक्यातील पर्यटन व्यवसाय व उद्योग यांचा विकास होण्यासाठी येथील स्थानिक आमदार देवेंद्र भुयार यांच्या निवेदनानुसार राज्यमंत्री कु. तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. येथे येणारे भाविक व पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी ट्रस्टच्या माध्यमातून विकास साधल्यास अधिक सहकार्य होईलअसेही राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या.

          अमरावती जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटन अशा दोन्ही अंगानी लोकप्रिय असलेल्या वरुड मोर्शी तालुक्यात लाखो भक्त व पर्यटक येतात. पर्यटन विभागामार्फत येथील विकासकामांना गती देण्यासाठी अर्थसहाय्य मिळावेअसे आमदार श्री. देवेंद्र भुयार म्हणाले.

          यावेळी बैठकीस एमटीडीसीचे कार्यकारी अभियंता विनय वावधानीपर्यटन सहा.संचालक रवि पवार व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech