वर्दीतील स्त्रीशक्ती पोलीस नाईक रेहाना नासिर शेख

0

 

मुंबई :वर्दीतील स्त्रीशक्ती पोलीस नाईक रेहाना नासिर शेख नवरात्र म्हणजे नऊ दिवस चालणारा सृजनाचा उत्सव. कोरोनाच्या लढ्यात आमच्या पोलीस दलातील स्त्रीशक्तीने कर्तव्यापलीकडे जाऊन सामाजिक जाणिवेतून उल्लेखनीय काम केले आहे.त्या स्त्री शक्तीचा सन्मान व गौरव करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न ..

शक्तीचे, बुद्धीचे, नीतीचे,

भक्ती-शक्ती व कृषी संस्कृतीचे प्रतीक असणारे नवरात्रीचे मंगल पर्व सुरु असताना महाराष्ट्र पोलीस दलातील स्त्रीशक्तीच्या कार्याचा यथोचित गौरव करणे मला गरजेचे वाटते.महाराष्ट्र पोलीस दलामध्ये स्त्रीशक्ती अनेक प्रकारे समाजाप्रती आपली बांधिलकी जपत आहेत.

पोलीस नाईक

रेहाना नासिर शेख

मुंबई पोलीस दलातील पोलीस नाईक रेहाना नासिर शेख यांनी पनवेल जवळील धामणी येथील ज्ञानाई माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या 50 विद्यार्थ्यांना दहावी पर्यंतचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारत दत्तक घेतले. सामाजिक जाणिवेतून लोकाभिमुख कार्य करणाऱ्या शेख यांचा पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणुन मला अभिमान आहे. असे गौरवोद्‌गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech