उत्कृष्ट चित्ररथ विजेत्यांचा,मुख्य राजशिष्टाचार अधिकारी यांच्या हस्ते गौरव.

0

                   मुंबई :उत्कृष्ट चित्ररथ विजेत्यांचा,मुख्य राजशिष्टाचार अधिकारी यांच्या हस्ते गौरव.. प्रजासत्ताक दिन 2020 मध्ये उत्कृष्ट चित्ररथ सादरीकरण केलेल्या सहा विभागांच्या अधिका-यांचा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा पाटणकर-म्हैसकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन मंत्रालयात गौरव करण्यात आला. यामध्ये पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागउच्च व तंत्र शिक्षण विभागशालेय शिक्षण व क्रिडा विभागसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागगृह आणि पर्यावरण विभाग यांना अनुक्रमे प्रथमद्वितीयतृतीय (विभागून) आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात आले. राजशिष्टाचार मंत्री यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र यावेळी प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला.

            प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे शासकिय विभागांमार्फत विविध क्षेत्रातील विकास कामांचे व योजनांचे दर्शन घडविणाऱ्या चित्ररथांचे सादरीकरण करण्यात येते. 26 जानेवारी 2020 रोजी प्रजासत्ताक दिनाचा 70 वा वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकिय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध विभागाचे एकुण 12 चित्ररथ संचलनात सहभागी झाले होते.

            सन्मानपत्र प्राप्त अधिका-यांचा आणि त्यांच्या विभागीय कर्मचा-यांचे मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा पाटणकर-म्हैसकर यांनी अभिनंदन केले. भविष्यातही आपण अशीच कामगिरी करून उत्साहपूर्वक योगदान द्यावे असे सांगून त्यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.

            प्रथम पारितोषिक पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या ‘स्वराज्याचे पहिले सरखेल’ या चित्ररथास घोषित करण्यात आले. विभागाच्यावतीने सहसंचालक मीनल जोगळेकर यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. द्वितीय पारितोषिक उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या ‘उच्च तंत्र शिक्षण विभागाची गरुडझेप’ या चित्ररथास घोषित करण्यात आले. विभागाचे अवर सचिव शशिकांत काकडे यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या ‘चला मुलींनो खेळुया’या चित्ररथास तर, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या ‘गौरव अण्णाभाऊंच्या कार्याचा, जागर जन्मशताब्दी वर्षाचा’ या दोन चित्ररथास तृतीय पारितोषिक विभागुन देण्यात आला. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिव स्वाती नानल, आणि सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, अवर सचिव सिद्धार्थ झाल्टे यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. तर उत्तेजनार्थ गृह विभागाच्या ‘सर सलामत तो पगडी हजार’ या ट्रॅफिकच्या चित्ररथास प्रदान करण्यात आला. अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पडवळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा पुरस्कार स्विकारला. पर्यावरण विभागाच्या ‘हवामान बदल: आव्हान व उपाययोजना’ या चित्ररथास उत्तेजनार्थ पोरितोषिक घोषीत करण्यात आले. विभागाच्यावतीने जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे यांनी सन्मान स्विकारला. कार्यक्रमावेळी राजशिष्टाचार विभागाचे उपसचिव उमेश मदान उपस्थित होते.

             या चित्ररथांचे गुणांकन करण्यासाठी सर जे.जे.उपयोजित कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता, सर जे.जे. स्कुल ऑफ आर्टचे अधिष्ठाता, आणि नाट्य विभागाचे संचालक यांची समिती गठीत करण्यात आली होती.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech