राज्यातील वस्त्रोद्योगांना भेडसावणाऱ्या अडचणी समन्वयातून सोडविणार

0

मुंबई : राज्यातील वस्त्रोद्योगांना भेडसावणाऱ्या अडचणी समन्वयातून सोडविणार ,वस्त्रोद्योग संबधित उद्योग, उर्जा आणि वित्त विभागांच्या एकत्रित बैठकांचे लवकरच नियोजन . राज्यातील वस्त्रोद्योगांना भेडसावणाऱ्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी शासन स्तरावर ठोस उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून लवकरच वस्त्रोद्योग विभागाशी संबधित उद्योग, उर्जा आणि वित्त व नियोजन विभागांच्या एकत्रित बैठकांचे लवकरच नियोजन करणार असल्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले.

राज्यात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण असून उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्या व अडीअडचणी दूर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. याच माध्यमातून राज्यातील वस्त्रोद्योगांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावेत याकरिता राज्यमंत्री यड्रावकर यांच्या पुढाकाराने मुंबईत बैठक झाली. यावेळी उद्योग राज्यमंत्री कु.अदिती तटकरे यांच्यासह वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव पराग जैन,वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव ड.ल. खरात, सुरेंद्र तांबे, इंचलकरंजीचे सुभाष मालपाणी आणि संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech