थकबाकीदार विकासकांवर एफ आय आर दाखल करणार

0

मुंबई: ‘म्हाडा’च्या पुनर्विकास योजनांमध्ये सहभागी असलेल्या ज्या विकासकांकडे थकबाकी आहे त्या सर्व थकबाकीदार विकासकांविरुद्ध एफ आय आर दाखल करणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

श्री.आव्हाड म्हणाले, विकासकांमार्फत भाडे अदा करण्याबाबत दिरंगाई व अनियमितता करणे आणि थकित रकमेचा भरणा न करणेबाबत त्यांना म्हाडा अधिनियम 1976 च्या कलम 95 अ(3) नुसार सक्तीच्या निष्कासनाची कारवाई करून संक्रमण गाळे ताब्यात घेण्यात येतील अशा आशयाच्या नोटीस यापुर्वीच त्यांना बजावण्यात आल्या आहेत. या नोटीसला विकासकांचा कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने विकासक करीत असलेल्या पुनर्विकास प्रकल्पास काम थांबवा नोटीस देण्यात आल्या आहेत. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या विषयाच्या अनुषंगाने सदस्य सर्वश्री, जोगेंद्र कवाडे, प्रविण दरेकर, प्रसाद लाड आदिंनी प्रश्न उपस्थित केला होता.

००००

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech