Browsing: मंगेश तेंडुलकर

MarathiNews
0

  मुंबई, दि. 11 : मंगेश तेंडुलकर यांच्या निधनाने साध्या,सोप्या चित्रसंकल्पनांच्या माध्यमातून बोलकी हास्य चित्रे…

MarathiNews
0

मुंबई, दि. 11 :  ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या निधनाने सामाजिक विसंगतीवर रेषांच्यासहाय्याने प्रभावी भाष्य करणारा कलावंत आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीश्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, तेंडुलकरांची व्यंगचित्रे सामाजिक प्रश्नांवर नेमकी बोट ठेवायची.सहज साध्या प्रसंगावरही ते मार्मिकतेने हास्यचित्र रेखाटायचे. त्यांच्या व्यक्तिमत्वातील साधेपणा त्यांच्या चित्रातहीउमटायचा. एक हास्य व्यंगचित्रकार म्हणून त्यांची ख्याती होतीच परंतु त्यांचे ललित लेखनही लोकप्रिय होते.त्यासोबतच सामाजिक बांधिलकीपोटीही विविध सामाजिक प्रश्नाबाबत ते सक्रीय  होते. त्यांच्या निधनाने एकव्यासंगी कलावंत आणि सामाजिक जाणिवा जोपासणारे व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे