‘स्नातकांनी आत्मनिर्भर होऊन श्रेष्ठ भारत निर्मितीसाठी योगदान द्यावे’ : राज्यपाल कोश्यारी

0

 

मुंबई : ‘स्नातकांनी आत्मनिर्भर होऊन श्रेष्ठ भारत निर्मितीसाठी योगदान द्यावे’ : राज्यपाल कोश्यारीयुवकांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे तसेच स्टँड अप इंडिया, स्टार्ट अप इंडिया, मुद्रा आदी योजनांचा अधिकाधिक लाभ घेऊन स्वतः आत्मनिर्भर व्हावे व श्रेष्ठ भारताच्या निर्मितीसाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

· राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत शिवाजी विद्यापीठाचा 57 वा दीक्षांत समारोह संपन्न

· दीक्षांत समारोहात 77542 स्नातकांना पदव्या प्रदान

विद्यार्थ्यांना ज्ञान व कौशल्य प्रदान करीत असतानाच विद्यापीठे समाजासाठी व परिसरासाठी मोठे योगदान देऊ शकतात असे सांगून राज्यातील सर्व विद्यापीठांनी समाजासाठी अधिक योगदान द्यावे, अशी सूचनाही राज्यपालांनी यावेळी केली.

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या 57 व्या वार्षिक दीक्षांत समारोहाला राजभवन, मुंबई येथून दूरस्थ माध्यमातून संबोधित करताना राज्यपाल कोश्यारी बोलत होते.

कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू प्रमोद पाटील, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech