सिरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग विझवणे आणि हानी टाळणे याला सद्यस्थितीत प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार.

0

मुंबई :सिरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग विझवणे आणि हानी टाळणे याला सद्यस्थितीत प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट इमारतीला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत. शहर आणि जिल्हा प्रशासनाच्या सर्व संबंधित यंत्रणा आग विझविण्याच्या आणि मदत कार्यात सहभागी आहेत. पुणे आयुक्तांकडून मी यासंदर्भातली माहिती घेतली असून दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत.सदर प्रकल्पाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात देशातून आणि देशाबाहेरही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात मी स्पष्ट करू इच्छितो की, कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीचा प्रकल्प सुरक्षित असल्याचे मला सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत आग विझवणे आणि दुर्घटनेमुळे होणारी हानी नियंत्रित ठेवणे यास सध्या प्राधान्य देण्यात येत आहे.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech