शिवभोजन थाळीचा दर पुढील सहा महिन्यांसाठी 5 रुपये

0

शिवभोजन थाळीचा दर पुढील सहा महिन्यांसाठी 5 रुपये. शिवभोजन थाळीचा दर 31 मार्च 2021 पर्यंत 5 रुपये एवढा करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर 1 ऑक्टोबर पासून पुढील 6 महिन्यासाठी हा दर लागू राहील. जानेवारी 2020 पासून 10 रुपये एवढ्या दराने शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात येत होती. कोरोनामुळे मार्च पासून या थाळीची किंमत 5 रुपये एवढी करण्यात आली. सध्या एकूण 906 शिवभोजन केंद्रांमधून थाळ्यांचे वितरण होते. ही योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत सुमारे 2 कोटी थाळ्या वितरित करण्यात आल्या आहेत.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech