शिवस्मारकाच्या निविदेसाठी ‘कॅग’च्या आक्षेपांची चौकशी होणार

0

मुंबई : मुंबई येथील अरबी समुद्रात उभारावयाच्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाकरिता राज्यशासन आग्रही आहे. मात्र यापूर्वी झालेल्या निविदा प्रक्रियेबाबत महालेखाकारांनी उपस्थित केलेल्या गंभीर आक्षेपांची चौकशी करून त्यानंतरच पुढील धोरणात्मक निर्णय घेतले जातील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

श्री.चव्हाण म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आराध्य दैवत असून, त्यांचे भव्य स्मारक जलदगतीने झाले पाहिजे. त्यासाठी सदनातील सर्व सदस्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. मात्र या स्मारकाच्या निर्मितीसाठी राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेवर महालेखाकारांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. शिवाय पर्यावरणाच्या अनुषंगाने न्यायालयांमध्ये विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे तूर्तास शिवस्मारकाचे काम मागील वर्षभरापासून थांबलेले आहे. तसेच मागील पाच वर्षात या स्मारकाच्या प्रत्यक्ष कामात विशेष प्रगती झालेली नसल्याची माहिती देखील श्री.चव्हाण यांनी यावेळी दिली.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य सर्वश्री, हेमंत टकले, विनायक मेटे, प्रविण दरेकर, अमरनाथ राजूरकर आदिंनी प्रश्न उपस्थित केला होता.

००००

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech