संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळसह विशेष सहाय्य योजनांसाठी डिसेंबर 2020 अखेर 4 हजार 743 कोटी रुपये वितरित

0

            मुंबई :संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळसह विशेष सहाय्य योजनांसाठी डिसेंबर 2020 अखेर 4 हजार 743 कोटी रुपये वितरित- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे. लातूरसह राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ, दिव्यांग निवृत्ती वेतन, विधवा निवृत्ती वेतन, राष्ट्रीय वृद्धापकाळ आदी योजनेतील राज्यातील संपूर्ण लाभार्थींना डिसेंबर 2020 अखेरपर्यंतचे संपूर्ण अनुदान वितरित करण्यात आले असून, यासाठी 4743 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री  धनंजय मुंडे  व राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी विधानपरिषदेत दिली.

            संजय गांधी निराधारसह अन्य सर्वच योजनांच्या लाभार्थींना जानेवारी 2021 पासूनच्या अनुदानाची वितरण प्रक्रिया राज्य शासन स्तरावर सुरू असल्याचेही मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

अनुदानाची रक्कम वाढवायची असेल तर केंद्रानेही सहकार्य करावे

            ‘संजय गांधी निराधार’सह अन्य सर्वच योजनांच्या लाभार्थींना निर्वाहभत्ता वाढवण्याबाबत शासन सकारात्मक आहे. केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये ७०% व काही योजनांमध्ये त्यापेक्षाही जास्त वाटा राज्य शासन उचलते.  महागाई  वाढत आहे, त्यामुळे या योजनांमधील भत्ता व अनुदान वाढविण्यासाठी आता केंद्रानेही सहकार्य करावे असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech