संजय दौंड यांना विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ

0

मुंबई : भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 171(3)(घ) अन्वये, महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे श्री.संजय पंडितराव दौंड यांची महाराष्ट्र विधानपरिषदेवर निवड झाली असून आज विधानभवनातील राष्ट्रकुल संसदीय मंडळ सभागृहात, कक्ष क्र.145, पहिला मजला, विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती श्री. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडून त्यानी महाराष्ट्र विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ देण्यात आली.

विधान भवनात झालेल्या या शपथविधी समारंभास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, विधानपरिषद सदस्य शरद रणपिसे, हेमंत टकले, श्रीकांत देशपांडे, विक्रम काळे, सतिश चव्हाण, किरण पावसकर तसेच विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (EM) उत्तमसिंग चव्हाण, उप सचिव विलास आठवले, ऋतुराज कुडतकर, अवर सचिव उमेश शिंदे यांचेसह आ.संजय दौंड यांचे कुटूंबिय, अनेक स्नेही तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
….

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech