रविवारी मेगा ब्लॉक दरम्यान  देखभाल दुरुस्तीची करण्यात आलेली कामे

0
 मध्य रेल्वे मुंबई विभागातील कोरोना योद्धांनी २६.७.२०२० रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला मुख्य मार्गाच्या चारही मार्गावर आणि कुर्ला-वाशी अप व डाउन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक दरम्यान देखभाल दुरुस्तीची कामे केली.  खालील कामांवर सुमारे ३५० कोरोना योद्धा कार्यरत होते.  या व्यतिरिक्त, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि  चिंचपोकळी दरम्यान सर्व उपनगरीय मार्गावर ब्लॉक संचालीत करून हँकॉक पुलाचे गर्डर बसविण्याच्या कामाचे संयोजन करण्यात आले.
 *अभियांत्रिकी*
शीव आणि माटुंगा दरम्यान ५ चेक रूळ व ४ क्रॉस ओव्हर्स बदलण्यात आले, एक ट्रॅक किमी लांबीच्या सरळ मार्गाच्या  रूळांचे  नूतनीकरण, ६ ठिकाणी अल्युमिनो-थर्मल वेल्डिंग, परळ ते माटुंगा दरम्यान ३९ टर्नओव्हर स्लीपर्स बदलण्यात आले,  माटुंगा व कुर्ला दरम्यान अप जलद मार्गावर ३.१ किमी लांबीचे बालास्ट ड्रेसिंग, शीव ते माटुंगा दरम्यान दोन वाघिणी कचरा  हटविण्यात आला, सँडहर्स्ट रोड ते भायखळा दरम्यान २.७ किमी लांबीसाठी बालास्ट साफ करण्यात आला , ६४ स्क्रॅप स्लीपर्स  हटाविण्यात आले , मस्जीद स्थानकाजवळील क्रॉसिंग बदलण्याचे काम. हार्बर मार्गावर २ कि.मी.चे बालास्ट टेम्पिंग, ८ ठिकाणी अल्युमिनो-थर्मल वेल्डिंग, गोवंडी व चेंबूर दरम्यान  ७ वाघिणी  भरून  कचरा काढण्याचे काम, कुर्ला येथे टर्नओव्हर  स्लीपर्स बदलण्यात आले.
 *ओएचई कार्य*
 जुने ब्रिटीश काळातील पोर्टल आणि त्याचे अपराइट्स  ६४० मीटर लांबीची संपर्क तार बदलण्यात आले, ६०० मीटरच्या ओएचईची वार्षिक ओव्हरहाऊलिंग आणि ब्रॅकेट असेंब्ली बदलणे, बाँडिंग, इन्सुलेटर, फीडर जम्पर इत्यादींचे देखभालीची  कामे केली गेली. सदरची कामे दोन  विशेष क्रेन, दोन टॉवर वॅगन्स आणि दोन शिडी टोळीसह करण्यात आली.
 *एस अँड टी वर्क्स*
 पॉईंट्सवर टंग व स्टॉक रूळ  बदलण्याचे कार्य, ऑडिओ फ्रीक्वेंसी ट्रॅक सर्किटचे ट्यूनिंग, माझगाव येथे ट्रॅक सर्किटचे ६ लीड वायर्स आणि ६ एस-बॉन्ड बदलण्यात आले, ११ ठिकाणी कॅबिनेट बॉक्सची देखभाल, भायखळा व परळ येथे के-बोर्ड व पॉईंट टेस्टिंग व परळ येथील क्रॉस ओव्हरवर टंग आणि स्टॉक रूळ  बदलण्यात आले,  बॅलास्ट मशीन पॅकिंग,   माटुंगा ते शीव दरम्यान अभियांत्रिकी कामांच्या अनुषंगाने अ‍ॅक्सल काउंटरची   डिस्कनेक्शन व पुनःजोडणी  सिग्नल व दूरसंचार योद्धांनी केली.
Share.

About Author

Maintain by Designwell Infotech