राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई मॅरेथॉनचे उद्घाटन टाटा मुंबई मॅरेथॉनची उत्साहात सुरुवात ; मुंबईकरांसह देश-विदेशातील धावपटूंचा सहभाग

0

मुंबई : दैनंदिन जीवनात व्यस्त असणाऱ्या नागरिकांमध्ये सुदृढ आरोग्याचा आणि सामाजिक जनजागृतीचा संदेश देणाऱ्या 17 व्या ‘टाटा मुंबई मॅरेथॉन’ची उत्साहात सुरुवात झाली. मॅरेथॉनच्या मुख्य स्पर्धेचे उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते गनशॉटद्वारे करण्यात आले. या मॅरेथॉनमध्ये मुंबईकरांसह देश-विदेशातील धावपटूंनी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन मुख्य स्पर्धेतील रोमांच वाढवला.

मुख्य स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री किरन रिजिजू, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार आदी उपस्थित होते.

मॅराथॉन विषयी – टाटा मुंबई मॅरेथॉन हि सलग 17 वर्षांपासून आयोजित करण्यात येत आहे. सुदृढ आरोग्यासह पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिक मुक्ती, झाडे वाचवा, पाण्याची बचत करा असे विविध सामाजिक जनजागृतीपर संदेश या मॅरेथॉनमध्ये नागरिकांकडून दिला जात होता. या वर्षी तब्बल 55 हजारहून अधिक स्पर्धक या मॅरेथॉन मध्ये सहभागी झाले होते.महिला स्पर्धकांचा लक्षणीय सहभाग या मॅरेथॉन मध्ये दिसून आला.सात ऑलिम्पिक पदकविजेती अमेरिकेची जिम्नॅस्टिक्सपटू शैनोन मिलर यांची या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या सदिच्छादूत म्हणून निवड झाल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरही या मॅरेथॉनचे महत्व आणि ओळख निर्माण होण्यास मदत झाली. लहान मुलांपासून तरुण- तरुणी, ज्येष्ठ नागरीक आणि अपंग स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला होता.

या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या तब्बल 55 हजाराहून अधिक स्पर्धकांसाठी 9 हजार पोलीस आणि 1 हजार 600 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. स्पर्धकांसाठीच्या वैद्यकीय सुविधेसाठी 11 रुग्णवाहिका, 600 वैद्यकीय कर्मचारी, 10 बाईक मेडिकस आणि 12 वैद्यकीय स्टेशन सुरु करण्यात आले होते. तसेच या मॅरेथॉनमध्ये कचरा व्यवस्थापन आणि विल्हेवाटीसाठी मुंबई महानगरपालिका सहकार्य करत आहे. या मॅरेथॉनच्या मार्गात निर्माण होणारा ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी व्यवस्था केली गेली.

….

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech