महिला आर्थिक विकास महामंडळाकडून जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन

0

मुंबई: जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने (माविम) दिनांक 7 मार्च, 2020 रोजी दुपारी 3 वा. सह्याद्री अतिथिगृह येथे दुपारी 3 वाजता ‘माविम’च्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून पोलीस उपायुक्त श्रीमती रश्मी करंदीकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ‘माविम’च्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती श्रद्धा जोशी यांनी दिली आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना (थीम) महिलांचे आरोग्य, सकस आहार व सुरक्षा अशी ठेवण्यात आली आहे. या अनुषंगाने मुंबईतील स्नेहा संस्थेच्या श्रीमती नीता करंदीकर आणि श्रीमती वैशाली वैद्य मार्गदर्शन करणार आहेत. कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून श्रीमती मीना नाईक महिला सुरक्षाविषयक जागृती या विषयाचे सादरीकरण करणार आहेत. महिलांनी आज सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या ‘माविम’च्या महिला या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मनोगत सादर करणार आहेत. कार्यक्रमामध्ये शंभर बचत गटातील महिला सहभागी होणार आहेत.

००००

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech