होम क्वारंटाईनच्या सूचना असलेल्यांनी स्थलांतर केल्यास कायदेशीर कारवाई

0

मुंबई: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून ज्यांना ‘होम
क्वारंटाईन’च्या सूचना दिल्या आहेत त्यांनी घरातच रहावे. स्थलांतर केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई
करण्याचे निर्देश राज्य शासनाने आज महसूल आणि पोलीस यंत्रणेला दिले आहेत.
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासन प्रभावी उपाययोजना करीत आहेत. ज्यांनी बाधित
भागातून प्रवास केला आहे अथवा परदेश प्रवासाचा इतिहास आहे किंवा बाधित भागातून प्रवास
केलेल्यांच्या निकटचे व्यक्ती आहेत, अशांना होम क्वारंटाईनच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश, नागपूर महानगर प्रदेश येथील ज्या व्यक्तींना होम
क्वारंटाईनचे आदेश आहेत, त्यांना तेथेच राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. महसूल आणि पोलीस
यंत्रणेतील अधिकारी घरोघरी जाऊन अशा व्यक्तींची तपासणी करतील. संबंधित व्यक्ती घरात आढळली
नाही तर त्यांच्यावर कायदेशीर करवाई करण्याचे निर्देश या यंत्रणेला देण्यात आल्याचे राज्य शासनाकडून
आज सांगण्यात आले.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech