हातमाग विकास आयुक्तांचे मुंबई कार्यालय नाशिकमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करणार

0

वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत हातमाग विकास आयुक्तांचे मुंबई कार्यालय महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करणार आहे. नाशिकमध्ये येवला तालुक्यात 8 मार्च रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

8 मार्च रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून महिला विणकरांना गौरवण्यात येणार आहे. त्याचबरोबर महिला विणकरांशी संवाद देखील साधला जाणार असून स्थानिक यशोगाथांचे सादरीकरण केले जाणार आहे. यानिमित्त चित्रकला स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले असून खासदार डॉ. भारती पवार या प्रदर्शनाचे उद्‌घाटन करतील. राष्ट्रीय पुरस्कार विजेते, संत कबीर पुरस्कार विजेते, राष्ट्रीय गुणवंत प्रमाणपत्रधारक, अखिल भारतीय हातमाग मंडळांच्या सदस्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech