प्रबोधन पाक्षिकाचे शताब्दी वर्ष मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे आयोजन

0

 

मुंबई : ‘प्रबोधन पाक्षिकाचे शताब्दी वर्ष’ मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे आयोजन.कवी कुसुमाग्रज, वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून शुक्रवार, दि. २६ फेब्रुवारी, २०२१ रोजी ग्रंथालय संचालनालयच्यावतीने “प्रबोधन पाक्षिकाचे शताब्दी वर्ष” व “मराठी भाषा गौरव दिन” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमामध्ये प्रबोधन पाक्षिकाचे प्रदर्शन, प्रबोधनकार लिखित व त्यांचेविषयी लिहिलेल्या मराठी ग्रंथांचे प्रदर्शन, दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन तसेच मराठी भाषेतील निवडक दर्जेदार ग्रंथांचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे.

“प्रबोधन पाक्षिक शताब्दी वर्ष ‘व “मराठी भाषा गौरव दिन” चे उद्घाटन शुक्रवार, दि. २६ फेब्रुवारी, २०२१ रोजी सकाळी ११.३० वा. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री श्री. प्राजक्त तनपुरे, अध्यक्ष, ज्येष्ठ कवी, साहित्यिक अरुण म्हात्रे, प्रमुख वक्ते ‘प्रबोधन’ पाक्षिक विषयावरील संशोधक डॉ. अनंत गुरव, उच्च व तंत्र शिक्षण विभागचे प्रधान सचिव ओ.पी .गुप्ता याची उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी https://www.youtube.com/DOLMaharashtra लिंकवर क्लीक करावे, असे आवाहन ग्रंथालय संचालक श्रीमती शालिनी इंगोले यांनी केले आहे.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech