पंडित प्रभाकर कारेकर यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित समारंभाला केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांची उपस्थिती देवाच्या कृपाशीर्वादा बरोबर सातत्य चिकाटी आणि लगन कलाकार घडवते

0

केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर हे आज सुप्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांच्या 75 व्या वाढदिवसाला उपस्थित होते.

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जावडेकर म्हणाले की निर्मळ मनाच्या माणसांना सदैव आनंददायी आयुष्य लाभते, हा माझा अनुभव आहे देवाच्या कृपाशीर्वाद बरोबरच कलाकाराला स्वतःचे सातत्य चिकाटी आणि लगन असावी लागते तरच तो कलाकार पट्टीचा कलाकार होऊ शकतो, कारेकर त्यातीलच एक होत.

हा कार्यक्रम नेहरू केंद्र सभागृह वरळी मुंबई येथे आज आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पद्मविभूषण आणि संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा, वरिष्ठ कलाकार डॉक्टर बाबासाहेब तराणेकर आणि अरूण गोडबोले यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमात प्रसिद्ध संतूरवादक राहुल शर्मा यांनी संतूर वादन केलं . योगेश साम्सी हे तबल्यावर होते तर बेगम परवीन सुलताना आणि मुकुंदराज देव तसेच श्रीनिवास आचार्य यांच्याबरोबर त्यांनी गायन सादर केल.

जावडेकर पुढे म्हणाले की, देशाची संपन्नता त्या देशाच्या ही सधनतेवर अवलंबून नसून विविध क्षेत्रात आपल्या कलेद्वारे योगदान देणाऱ्या कलाकारांवर अवलंबून असते. कलाकाराने राजापुढे झुकायचे नाही तर राजाने कलाकारांचा सन्मान करायचा असतो. आज मला पंडित कार्लेकर यांचा सन्मान करता आला हे माझं भाग्य आहे.

श्री जावडेकर यांच्या हस्ते पंडित प्रभाकर कारेकर यांच्या जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.

पंडित प्रभाकर कारेकर विषयी बोलताना पंडित शिवकुमार शर्मा म्हणाले की पंडित कारेकर यांनी गुरुंकडे शिक्षण घेऊन त्या शिक्षणावर आधारित स्वतःची एक शैली विकसित केली.

प्रसिद्ध गायिका बेगम परवीन सुलताना म्हणाल्या की, पंडित प्रभाकर कारेकर आणि त्यांचा चाळीस वर्षाचा गायन क्षेत्रातील दीर्घ अनुभव असून अतिशय मैत्रीपूर्ण आणि काळजी घेणारा स्नेही मला कार्यकर्त्यांच्या द्वारे मिळाला आहे असे त्या म्हणाल्या. त्यांना दीर्घायुष्य आरोग्य लाभो अशी इच्छा सुलताना यांनी व्यक्त केली.

पंडित प्रभाकर कारेकर यांनी भारतीय शास्त्रीय संगीतात आपली स्वतःची छाप पाडून अनेक पुरस्कार संपन्न केलेत. त्यांनी संगीताचे धडे पंडित जितेंद्र अभिषेकी पंडित सुरेश हळदणकर आणि स्वर्गीय पद्मभूषण पंडित सी आर व्यास यांच्याकडे घेतले.

त्यांना 2014 मध्ये तानसेन सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले तर 2016 मध्ये संगीत संगीत नाटक अकादमी पुरस्कारही त्यांना मिळाला.आकाशवाणी आणि दूरदर्शन वरील वरील शास्त्रीय संगीताच्या संगीताचे अ श्रेणीतील कलाकार आहेत.

ते स्वर प्रभात या ट्रस्टचे संस्थापक आणि अध्यक्ष असून युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्याचा तसेच शास्त्रीय संगीत शिकवण्याचं काम ही ट्रस्ट करते.

IANS.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech