ऑनलाइन ७/१२ व ८अ बाबत सामंजस्य कराराचेअन्न, नागरी पुरवठा आणि महसूल विभागामध्ये आदान प्रदान

0

 

मुंबई : ऑनलाइन ७/१२ व ८अ बाबत सामंजस्य कराराचेअन्न, नागरी पुरवठा आणि महसूल विभागामध्ये आदान प्रदान. धान्य खरेदीतील गैरव्यवहारांना आळा बसणार. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत कृषी विभागाने जाहीर केलेल्या उत्पादनापेक्षा अधिक धानाची खरेदी होत असल्यामुळे धान खरेदीत गैरप्रकार होत असल्याची बाब निदर्शनास आली होती. त्यामुळे अन्न नागरी पुरवठा विभागाच्या मागणीप्रमाणे महसूल विभागाकडून आता शेतकऱ्यांना गाव नमुना सातबारा उतारा, आठ ‘अ’ हे दस्तऐवज ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून दिले जाणार आहेत. महसूल आणि अन्न नागरी पुरवठा विभागात यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला असून या सामंजस्य कराराचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री. छगन भुजबळ आणि महसूलमंत्री श्री. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत दोन्ही विभागामध्ये आदान-प्रदान झाले.

डिजिटल स्वरूपात सातबारा उतारा आणि नमुना आठ ‘अ’ उपलब्ध केल्यामुळे किमान आधारभूत किंमत खरेदीमधील गैरप्रकारांना आळा बसून धान खरेदीत पारदर्शकता येणार आहे.योजनेचा लाभ हा गरजू शेतकऱ्यांनाच होणार असल्याने शासनाचे नुकसान टाळता येणार आहे, त्यामुळे बिगर शेतकऱ्यांकडून धान खरेदी होणार नाही.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech