निवडणूक आयोगाबाबत आक्षेपार्ह विधान अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई  : भारत निवडणूक आयोगाबाबत आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल भारतीय रिपब्लिकन पार्टी – बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरुद्ध यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीसांमध्ये गुन्हा नोंदविला आहेअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

निवडणूक आयोगाबाबत अ‍ॅड. आंबेडकर यांनी काल दिग्रस (जि. यवतमाळ) येथे झालेल्या जाहीर सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्या अनुषंगाने त्यांच्या विरुध्द दिग्रस पोलीस ठाण्यामध्ये भा.दं.वि. कलम 503, 506, 189 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech