एस.सी –एस.टी उद्योजक विकास परिषदेचे उद्योगमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन

0

मुंबईदि. 2 : राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती हब (NSSH) उपक्रमांतर्गत उद्योजक विकास परिषद व उत्पादनाचे प्रदर्शन दि. 3 ते 5 डिसेंबर या कालावधीत वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे होणार असून या परिषदेचे उद्या सोमवार दि. 3 डिसेंबर रोजीदुपारी 2.30 वा. उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. उद्योग व खनिकर्म राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटीलउद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सतीश गवई हे ही यावेळी उपस्थित राहणार आहेत.

केंद्र शासनाने अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उद्योजकांच्या विकासासाठी शासनाच्या खरेदी धोरणात 4 % आरक्षण व प्राधान्य देण्याचे धोरण जाहीर केलेले असूनया धोरणाची National SC-ST HUB (NSSH) अंतर्गत अंमलबजावणी करण्यात येत असते. शासनाच्या उद्योग विभागामार्फत NSSH अंतर्गत असलेले अनुसूचित जाती-जमाती उद्योजकांचा 4 टक्के सहभाग राहण्यासाठी राज्यात  विविध ठिकाणी चर्चासत्रेपरिषदाप्रदर्शने आयोजित करण्यात येतात. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लघु उद्योजकांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती हब (NSSH) उपक्रमांतर्गत राज्य शासनाच्या उद्योग विभागाने तीन दिवसीय परिषदेचे आयोजन केले आहे.

या परिषदेसाठी राज्यातील विविध औद्योगिक संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे.   राज्यातील अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील 500 उद्योजक सहभागी होणार असूनपरिषदेमध्ये विविध विषयावरील मार्गदर्शनचर्चासत्रे तसेच सुमारे 150 उद्योजकांनी उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे प्रदर्शन आयोजित केलेले आहे. प्रदर्शनामधील केंद्र शासनाचे विविध सार्वजनिक उपक्रम/कंपन्या यांच्याकडे पुरवठा करण्यासाठी असलेल्या संधीचे या प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण असणार आहे. सहभागी उद्योजकांसाठी अभियांत्रिकीबंदरे व शिपिंगबांधकाम क्षेत्रातील संधीराज्य शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील संधीतेलइंधन व रसायन क्षेत्रातील खरेदीच्या संधी तसेच खासगी क्षेत्रातील खरेदीच्या संधीबाबत तज्ञ वक्त्यांची चर्चासत्रे आयोजित करण्यात आलेली आहेत.

एन.एस.आय.सी.कोकण रेल्वेपश्चिम व मध्य रेल्वेआय.आर.सी.टी.सी.भेलमाझगाव डॉकमहाजेनकोमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ,एचपीसीएलओएनजीसीआरसीएफएमटीडीसीएचएएलडीआरडीओॲम्युनिशन फॅक्टरी या नामांकित सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या संस्था या परिषदेमध्ये सहभागी होणार असूनटाटा मोटर्समहिंद्रा ॲन्ड महिंद्राफियाटशिंडलरटाटा कमिन्सहेअरबडवे इंजिनिअरींग आदी खासगी क्षेत्रातील मोठे उद्योग देखील सहभागी होणार आहेत. निर्यात वृध्दी व कार्यपध्दती बाबत विशेष चर्चासत्राचे आयोजन केलेले असून,  वित्तीय सहाय्यासाठी विविध राष्ट्रीय व खासगी बँका देखील सहभागी होणार आहेत.

दिनांक 5 डिसेंबर  रेाजी सहभागी उद्योजकांना नवीन तंत्रज्ञान व अधिक माहितीकरीता महिंद्रा अँड महिंद्रा लि.कांदिवलीइंडियन इंन्स्टिटयूट ऑफ पॅकेजिंग या ठिकाणी भेटी व चर्चा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.  या परिषदेमध्ये सहभाग नोंदविण्याकरिता ऑनलाईन नोंदणीद्वारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार विनाशुल्क प्रवेश देण्यात येणार आहे. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उद्योजकासाठी अतिशय महत्वपूर्ण परिषदेस मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा,असे आवाहन विकास आयुक्त (उद्योग) डॉ.हर्षदीप कांबळे यांनी केले आहे.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech