कराड तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

0

केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारने विकासकामांच्या आणि कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. या विश्वासामुळेच विरोधकांना आपले अस्तित्व संपण्याची भीती वाटते आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड दक्षिण तालुक्यातील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटचे कार्यकर्ते आ. आनंदराव पाटील यांचे पुत्र सुनील आणि प्रताप तसेच वसंतराव शिंदे, आर . टी . स्वामी, अशोकराव भावके, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सविनय कांबळे, हरिभाऊ जोशी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. ‘आम्ही भाजपचे काम निष्ठेने करू अशी ग्वाही या सर्व कार्यकर्त्यांनी या वेळी दिली.

मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्यांची सध्या रीघ लागली आहे. जनतेच्या मनात भाजप सरकार आपल्यासाठी चांगल्या प्रकारे काम करीत आहे अशी खात्री सामान्य जनतेला वाटू लागली आहे. नव्याने प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना क्षमतेप्रमाणे कामे दिली जातील, जबाबदाऱ्या सोपविल्या जातील. या कार्यकर्त्यांना त्यांच्या भागातील विकासकामे मार्गी लावता येतील.

या वेळी प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या, प्रदेश सरचिटणीस आ. सुजीतसिंग ठाकूर, प्रदेश मुख्य प्रवक्ते माधवराव भांडारी, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुलबाबा भोसले आदी या प्रसंगी उपस्थित होते.

www.forevernews.in

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech