‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ मध्ये ग्रामीण परिवर्तन विषयी मुलाखत

0

मुंबईदि. 3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित जय महाराष्ट्र” आणि दिलखुलास‘  कार्यक्रमात राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प विषयी विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशीग्रामविकास विभागाचे सचिव असिमकुमार गुप्ता तसेच महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या (व्हीएसटीएफच्या) कार्यकारी संचालक श्वेता शालिनी यांनी सहभाग घेतला आहे.

            ही मुलाखत जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात मंगळवार दि. 4 डिसेंबर 2018 रोजी  दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून संध्याकाळी 7.30 ते 8 या वेळेत तसेचदिलखुलास‘ या कार्यक्रमात आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून मंगळवार दि.4 आणि बुधवार दि.5 डिसेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अत्यंत महत्वकांक्षी असलेला स्मार्ट प्रकल्प अर्थातच राज्य कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाची सुरूवात पाच डिसेंबरला होत आहे. या अभियानाचे उद्दिष्टव्याप्तीभविष्यातील नियोजनतसेच व्हीएसटीएफ म्हणजेच महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची सद्यस्थिती,स्मार्ट आणि व्हीएसटीएफ मध्ये युवकांचा सहभागस्मार्ट प्रकल्पामुळे ग्रामविकासाला मिळणारी चालनाशासनाबरोबरच खाजगी कंपन्यांचे मिळणारे सहकार्य तसेच महिला स्वयंसेवी संस्थांचा सहभाग याबाबत सविस्तर माहिती श्री. परदेशीश्री. गुप्ता व श्रीमती शालिनी यांनी जय महाराष्ट्र‘ व दिलखुलास‘ कार्यक्रमातून दिली आहे.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech