गृह मंत्रालयाच्या ट्विटर हँडलवर सायबर गुन्ह्यासंदर्भात जनजागृती

0

मुंबईदि. 3 : सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व त्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने ट्विटरवर @CyberDost या नावाने हँडल सुरू केले आहे. या हँडलद्वारे सायबर गुन्ह्यांबद्दलची सर्वसाधारण माहिती तसेच यासंबंधी घ्यावयाची काळजी याबद्दल नियमित माहिती देण्यात देण्यात येत आहे. नागरिकांनी या ट्विटर हँडलवरून माहिती घेण्याचे आवाहन गृह मंत्रालयाने केले आहे.

                आधुनिक तंत्रज्ञान वाढत असतानाच देशात सायबर गुन्हेही वाढत आहेत. लोकांमध्ये या विषयी माहिती नसल्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे होत आहे. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने पावले उचलली आहेत. त्याचबरोबर लोकांमध्ये जागृती होणेही महत्त्वाचे आहे. बँकेचा युजर आयडीएटीएम/डेबीट कार्डचा क्रमांक व पीनपासवर्डओटीपी कोणाही व्यक्तिला देऊ नयेअसे आवाहन गृह मंत्रालयाने केले आहे.

                तसेच सायबर गुन्हे कसे घडतातत्यांची कार्यपद्धती कशी आहे. त्यापासून वाचण्यासाठी काय करावेयाबद्दलची माहिती देण्यासाठी गृह मंत्रालयाने ट्विटरवर@CyberDost या नावाने हँडल सुरू केले आहे. या ट्विटर हँडलवरून नागरिकांना आवश्यक ती माहिती मिळत असून त्यातून नागरिकांच्या माहितीत भर पडणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमितपणे या ट्विटर हँडलला भेट द्यावी व त्याला फॉलो करावेअसे आवाहन केंद्रीय गृह मंत्रालयाने केले आहे.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech