अपर मुख्य सचिव एस.एस.संधूया अंकाचे अतिथी संपादक

0

 

मुंबई, दि.22 : ‘आपलं मंत्रालय’ या मे महिन्याच्या सुट्टी विशेषांकाचे प्रकाशन आज सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस.एस.संधू यांच्या हस्ते मंत्रालयातीलदालनात करण्यात आले. उन्हाळ्याच्या सुट्टीच्या दिवसातील हरवलेले खेळ,सुट्टीच्या बालपणीच्या आठवणी सांगणारे अनुभव,कथा,कविता,सुट्टीच्या काळातील फिरण्याची मजा सांगणारे किस्से अशा वाचनिय गोष्टींचा नजराणा वाचकांना या अंकात मिळणार आहे.या अंकाचे अतिथी संपादक अपर मुख्य सचिव एस.एस.संधू आहेत.

यावेळी सहकार विभागाचेउपसचिव रमेश शिंगटे,उपनिबंधक कैलाश झेबले, उपसचिव सुदीन गायकवाड, आपलं मंत्रालयचे संपादक सुरेश वांदिले,सहायक संपादक मंगेश वरकड, विभागीय संपर्क अधिकारी शैलजा वाघ दांदळेउपस्थित होते.या अंकात वाचकांना सुट्टीच्या आठवणी देणाऱ्या कथा,कविता,आठवणी याची मेजवाणी मिळणार आहे.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech