मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महर्षी वाल्मिकी यांना जयंती निमित्त अभिवादन

0

 

 

मुंबई :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महर्षी वाल्मिकी यांना जयंती निमित्त अभिवादन.  मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी आज महर्षी वाल्मिकी यांना जयंती निमित्त अभिवादन केले. मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मुख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणतात, आदिकवी महर्षी वाल्मिकी मानवी जीवनाला प्रगतीचा मार्ग दाखविणारे महान दार्शनिक होते. त्यांनी रामायण या महाकाव्यातून आपल्या समोर प्रभू श्रीरामचंद्रांचा आदर्श जीवनपट मांडला. प्रभू श्रीरामांचे न्याय आणि सर्वसामान्यांच्या कल्याणाचा विचार करणारे रामराज्य आजही आपल्यासाठी वंदनीय आहे. महर्षी वाल्मिकीचे जीवन अनेकांसाठी प्रेरणादायी आणि वंदनीय असेच आहे. जयंती निमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम आणि सर्वांना वाल्मिकी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech