‘मिशन लसीकरण’ विषयावर‘दिलखुलास’ कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मुलाखत

0

 

मुंबई : ‘मिशन लसीकरण’ विषयावर‘दिलखुलास’ कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मुलाखत.माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘मिशन लसीकरण’ या उपक्रमांतर्गत ‘लसीकरणानंतरची स्थिती आणि प्रतिकारशक्ती’ या विषयावर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री.राजेश टोपे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच न्युज ऑन एअर या ॲपवरून बुधवार दि. 7 आणि गुरुवार दि. 8 एप्रिल रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथ्था यांनी ही मुलाखत घेतली आहे.

लसीकरणाचे टप्पे, लसीकरणाविषयी असलेले विविध गैरसमज, हर्ड इम्युनिटी आणि अँटिबॅाडीज म्हणजे काय, राज्यातील लसीकरणाची प्रक्रिया, लसीकरणाविषयी राज्यातील नागरिकांना केलेले आवाहन, लसीकरणाचे फायदे याबाबतची माहिती श्री. टोपे यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech