मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्ज चक्रव्युहामधून महिलांना बाहेर काढण्यासाठी राज्यस्तरीय अभ्यासगट नियुक्त – ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ

0

 

मुंबई: मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्ज चक्रव्युहामधून महिलांना बाहेर काढण्यासाठी राज्यस्तरीय अभ्यासगट नियुक्त महिलांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासगट उपाययोजना सुचविणार. ग्रामीण भागातील सुक्ष्म वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांच्या (मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या) कर्ज चक्रव्युहामध्ये अडकलेल्या महिलांना त्यामधून बाहेर काढणे तसेच महिलांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना सुचविण्याकरिता राज्यस्तरीय अभ्यासगट नियुक्त करण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी दिली. हा अभ्यासगट पुढील तीन महिन्यात अभ्यास करुन किमान अंतरीम अहवाल सादर करेल. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचेही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, राज्यात ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता गटातील महिलांना बॅंकेकडून कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे अनेक महिला सुक्ष्म वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था (मायक्रो फ़ायनान्स कंपनी) यांच्याकडून कर्ज घेतात असे निदर्शनास आले आहे. वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांच्या कर्ज चक्रव्युहात या महिला हळहळू अडकत जातात व त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर परिणाम होतो. याबाबत अभ्यास करण्यासाठी तसेच महिलांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना सूचविण्यासाठी राज्यस्तरीय अभ्यासगट स्थापन करण्यात येत आहे. या अभ्यासगटाच्या अध्यक्षपदी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांची नियुक

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech