संत जगनाडे महाराज जयंतीदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

0

 

मुंबई : संत जगनाडे महाराज जयंतीदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन. संत संताजी जगनाडे महाराजांच्या जयंतीनिमित्त मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मुख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणतात, संत जगनाडे महाराज यांनी जगद्गुरु तुकाराम महाराज यांना गुरू मानले. त्यामुळेच तुकोबारायांची गाथा आपल्यापर्यंत पोहचली. संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचा पाया घातला आणि तुकोबारायांनी कळस रचला असे म्हटले जाते. तुकाराम महाराजांचे अभंग अनमोल ठेवा आहे. त्यांचे अनेक अभंग संत जगनाडे महाराजांनी लिहून ठेवल्यामुळे मराठी आणखी समृद्ध झाली. त्यांनी स्वत:ही उद्बोधक अशा अनेक रचना लिहिल्या. संत जगनाडे महाराजांचे हे योगदान अपूर्व आहे. संत जगनाडे महाराजांच्या पवित्र स्मृतींना त्रिवार अभिवादन.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech