मजुरांची उपस्थिती वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येणार.

0

      मुंबई:मजुरांची उपस्थिती वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येणार .महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागात वेगवेगळया कामांसाठी मजुरांची आवश्यकता असते मात्र आज अनेक कामांसाठी मजूर मिळत नाही असे दिसून येत आहे. त्यामुळे रोजगार हमी योजना विभागाच्या माध्यमातून मजुरांची उपस्थिती वाढविण्यासाठी पुढील काळात व्यापक स्तरावर जनजागृती करण्यात येणार असल्याचे रोहयो राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

            स्वयंसहाय्यता/बचत गटातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी रोजगार हमी योजनेमार्फत विविध योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आढावा बैठक रोह्यो राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस नरेगाचे आयुक्त शंतनू गोयलरोहयो विभागाचे अधिकारी यांच्यासह यशस्विनी सामाजिक अभियानाच्या वर्षा निकमरत्नमाला शिंदेज्योती पावरामनिषा केंद्रेउज्ज्वला राऊत उपस्थित होते.

            राज्यमंत्री श्री. बनसोडे म्हणाले कीआज अनेक ठिकाणी अकुशल मजूर मिळतात पण ते कामावर येण्यास तयार नसातात. येणाऱ्या काळात मजुरांनी जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग नोंदविणे यादृष्टीने काम करण्यात येणार आहे. मजूर उपस्थिती वाढविण्यासाठी ग्रामसभा आणि बचत गट यांचाही आधार घेण्यात येणार आहे. तसेच ग्रामस्तरावरील सर्व लोक प्रतिनिधींना रोहयोबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

            रोहयो मजूरांना मजुरी विहीत कालावधीत मिळेल याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे.या योजनेबाबत दर 15 दिवसांनी आढावा घेण्यात यावा. रोहयो कामाची रक्कम मजूर

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech