महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

0

 

मुंबई : महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन.आद्य समाजसुधारक, समतेचे प्रणेते महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विनम्र अभिवादन केले.

वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार र्पण केला.

‘अनुभवमंटप’ मधून लोकशाही प्रणालीचा विचार देणाऱ्या बसवेश्वर यांची शिकवण आजही मार्गदर्शक आहे. जातीअंतासाठी बसवेश्वर यांनी प्रसंगी व्यवस्थेशी संघर्ष केला. श्रम प्रतिष्ठा, महिलांचे अधिकार यांचा पुरस्कार केला. जागतिक पातळीवरील अभ्यास- संशोधनातून महात्मा बसवेश्वर यांना सामाजिक समरसतेचे आद्य प्रणेते म्हणून गौरविण्यात आले आहे, हे देखील अभिमानास्पद आहे, असे मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटले आहे.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech