महाराष्ट्राचे महालेखाकार म्हणून अनंत किशोर बेहरा यांनी स्वीकारला पदभार

0

 

मुंबई दि. 15 : महाराष्ट्राचे महालेखाकार  (Accountant General ) म्हणून अनंत किशोर बेहरा यांनी दि. ९ मार्च २०१८ रोजी पदभार  स्वीकारला असून त्यांच्याकडे  राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची  सेवानिवृत्तीची, भविष्यनिर्वाह निधीची प्रकरणे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या मासिक आणि वार्षिक लेख्याचे काम सोपविण्यात आले आहे.

श्री. बेहरा हे भारतीय ऑडिट आणि अकाऊंट सर्व्हिसेसच्या १९९८ च्या बॅच चे अधिकारी आहेत अशी माहिती प्रधान महालेखाकार कार्यालय (लेखा व हकदारी) I महाराष्ट्र, यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.

Share.

About Author

Maintain by Designwell Infotech